मोदींना अमेरिकेत न बोलवण्याची शिख संघटनेची ओबामांना विनंती

modi
न्यूयॉर्क – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अमेरिकेच्या एका मानवाधिकार संघटना ‘सिख फॉर जस्टीस’ने एक ऑनलाईन मोहिम सुरू केले आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती यांनी मोदी यांना गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या जातीय दंगलीचा संदर्भ देत पाठवलेले आमंत्रण रद्द करावी अशी मागणी या संघटनेने केली आहे. सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौर्‍यावर जाणार आहेत. तेथे मोदी संयुक्त राष्ट्राच्या आम सभेत भाषण करणार आहेत. त्यानंतर ते वाशिंग्टन डीसीला रवाना होती.

सोनिया गांधी आणि तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या विरोधातही ‘सिख फॉर जस्टीस’ने 1984 च्या शिख विरोधी दंगलीसंदर्भात अशी मोहिम सुरू केली होती. ‘सिख फॉर जस्टीस’तर्फे सोमवारी सुरू करण्यात आलेल्या या ऑनलाईन मोहिमेव्दारे करण्यात आलेल्या याचिकेत “राष्ट्रपती बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये मोदींच्या पाहूणचाराऐवजी विरोध करायला हवा. तसेच मुस्लीम, शिख आणि ख्रिस्ती बांधवांवर झालेल्या हिंसाचारासंदर्भात भाजपावर बंदी घालायला हवी” असे म्हटले आहे.