
नवी दिल्ली – अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने ग्लासगो राष्ट्रकुलमध्ये दुखापतीमुळे सहभागी होता आले नसल्याबद्दल देशवासियांची जाहीर माफी मागितली असून अन्य सहका-यांची कामगिरी उंचावेल आणि भारताला बॅडमिंटनमध्ये अधिक सुवर्णपदके मिळतील, असा विश्वास तिने व्यक्त केला आहे.
सायनाने मागितली देशवासियांची जाहीर माफी
ऑस्ट्रेलियन ओपनदरम्यान मला ग्रोइन दुखापतीचा त्रास जाणवू लागला. त्यातच या स्पर्धेनंतर राष्ट्रकुलसाठीचा सराव करायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे राष्ट्रकुलमधून माघार घेण्याला मी प्राधान्य दिले असे ग्लासगोमधील माघारीबाबतचे कारण विचारले असता तिने उत्तर दिले. त्याचबरोबर राष्ट्रकुलनंतर दोन मोठय़ा स्पर्धा असून त्यासाठी मी १०० टक्के तंदुरुस्त होण्यास उत्सुक आहे असे सायना म्हणाली.
