शकीब हसनचा माफीनामा

shakib-al-hasan
ढाका – बांगलादेश क्रिकेट मंडळाकडे क्रिकेटपटू शकीब अल हसनने घालण्यात आलेल्या बंदीचा कालावधी कमी करावा यासाठी अपील केले असून त्याने रविवारी आपल्या गुन्हय़ाबाबत मंडळासमोर माफी मागितली.

शकीब अल हसनवर बेशिस्त वर्तनाबद्दल बांगलादेश क्रिकेट मंडळाने 2015 च्या अखेरपर्यंत विदेशात खेळण्यास बंदी घातली होती. बंदीचा कालावधी सहा महिन्यांनी कमी करावा, अशी विनंती शकीब हसनने बांगलादेश क्रिकेट मंडळाकडे केली आहे. भविष्यात बांगलादेश संघाकडून क्रिकेट खेळण्याची इच्छा त्याने प्रकट केली. 27 वर्षीय शकीब अल हसनने 34 कसोटी आणि 136 वनडे सामन्यांत बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले आहे.

Leave a Comment