पुढील आठवडय़ात सॅबेलाचा निर्णय

alejandro-sabella
ब्युनोस आयरिश – जर्मनीने ब्राझीलमध्ये फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा पराभव करून जेतेपद मिळविले. अर्जेंटिना संघाची या पराभवामुळे थोडी पिछेहाट झाली. या पराभवामुळे प्रशिक्षक पदावरून ऍलेजेंड्रो सॅबेला याना कदाचित बाजूला व्हावे लागेल. अर्जेंटिनाच्या फुटबॉल फेडरेशनने लवकरच प्रशिक्षक बदलाविषयी निर्णय घेणार आहे. पण सॅबेला स्वतः आपल्या भवितव्याचा निर्णय पुढील आठवडय़ात घेणार आहेत.

सॅबेलाच्या मार्गदर्शनाखाली अर्जेंटिनाने विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. आता अर्जेंटिनाचा जर्मनीविरुद्धचा सामना डय़ुसेलडॉर्फ येथे 3 सप्टेंबरला होणार आहे. युरो चषक 2016 च्या स्कॉटलंडविरुद्ध पात्र फेरीचा अर्जेंटिनाचा सामना 7 सप्टेंबरला खेळविला जाईल. ऑक्टोबरमध्ये ब्राझील आणि हाँगकाँग यांच्याबरोबर अर्जेंटिनाचे मित्रत्वाचे सामने खेळविण्यात येणार आहेत.

Leave a Comment