आता आंध्रकडून खेळणार मोहम्मद कैफ

kaif
कानपूर – भारताचा माजी कसोटीवीर मोहम्मद कैफ गेली 15 वर्षे उत्तरप्रदेश संघाकडून खेळत होता. पण कैफ आता आंध्रप्रदेश संघाकडून खेळणार आहे. आगामी रणजी मोसमात तो आंध्रप्रदेशचे प्रतिनिधित्व करणार आहे.

आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 13 कसोटी आणि 125 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. 1998 पासून त्याने उत्तरप्रदेश संघाकडून 85 रणजी सामने खेळले आहेत. कैफ आता अलाहबाद शहराला निरोप देत असून तो आंध्रप्रदेशमध्ये दाखल होणार आहे. आंध्रप्रदेश क्रिकेट संघटनेचे सचिव गंगाराजू हे काही दिवसांपासून कैफच्या संपर्कात होते. 2002 साली नॅटवेस्ट क्रिकेट मालिकेतील अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध मिळविलेल्या भारताच्या विजयामध्ये कैफचे योगदान महत्त्वाचे ठरले होते.

Leave a Comment