चौदाव्या टप्प्याचे जेतेपद पोलंडच्या सायकलपटूकडे

majaka
रिसोल – टूर डी फ्रान्स शर्यतीत शनिवारी झालेला 14 वा टप्पा पोलंडचा युवा सायकलपटू राफाल माजकाने जिंकला. आधीच्या फेरीत त्याला दुसरे स्थान मिळाले होते. ती निराशा त्याने विजय मिळवित दूर केली.

ग्रेनोबोल ते रिसोल हा 177 किलोमीटर्सचा अल्पाईन टप्पा माजकाने प्रारंभापासून आघाडी घेत जिंकला. या शर्यतीचा सर्वंकष आघाडीवर असलेल्या व्हिन्सेन्झो निबालीने दुसरे स्थान मिळविताना आपली आघाडीही कायम ठेवली. फ्रान्सचा 37 वर्षीय जीन ख्रिस्तोफ पेरॉडने या टप्प्यात तिसरे स्थान मिळविले. चौथ्या व पाचव्या स्थानासाठी बरीच चुरस झाली. फ्रान्सच्या युवा रोमेन बार्डेटने पाचवे व थिबॉ पिनॉटने चौथे स्थान मिळविले तरी निबालीला त्यांनी तीव्र झुंज दिली.

Leave a Comment