बंगाल क्रिकेट संघटनेच्या संयुक्त सचिवपदी गांगुलीची वर्णी!

ganguly
कोलकाता : 27 जुलै रोजी बंगाल क्रिकेट संघटनेच्या होणाऱ्या 83 व्या वार्षिक बैठकीत माजी भारतीय कर्णधार सौरभ गांगुलीची संयुक्त सचिवपदी वर्णी लागणे जवळपास निश्चित मानले जात असून गांगुली संयुक्त सचिवपदाची सूत्रे सुजन मुखर्जी यांच्याकडून स्वीकारण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदी जगमोहन दालमिया कायम राहतील, असेही संकेत आहेत.

सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या पतौडी चषक स्पर्धेत गांगुली समालोचनाची जबाबदारी सांभाळत असून त्याने यापूर्वीच बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली असल्याचे कॅबचे संयुक्त सचिव सुबीर गांगुली यांनी सांगितले. दि. 20 जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत असून गांगुलीतर्फे त्याचा क्लब बरिशा स्पोर्टिंगतर्फे अर्ज दाखल केला जाणार आहे, असेही ते म्हणाले. गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशिषने मात्र आपल्याला याबद्दल काहीही कल्पना नसल्याचे सांगितले.

Leave a Comment