ऑगस्टमध्ये भारत-पाक फुटबॉल मालिका

football
कराची – पाक फुटबॉल फेडरेशनने येत्या ऑगस्टमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात फुटबॉल मालिका खेळविली जाणार असल्याची माहिती दिली आहे. 16 ते 21 ऑगस्ट दरम्यान पाकचा फुटबॉल संघ भारतात येणार असून 17 आणि 20 ऑगस्ट रोजी भारत आणि पाक यांच्यात दोन सामने खेळविले जातील. पाक फुटबॉल संघटनेचे सचिव कर्नल लोधी यांनी उभय संघातील क्रीडासंबंध सुधारण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले. यापूर्वी म्हणजे 2005 च्या जूनमध्ये उभय देशांत तीन सामन्यांची फुटबॉल मालिका खेळविण्यात आली होती आणि ती सरस गोल सरासरीच्या जोरावर भारताने जिंकली होती. पाकचा फुटबॉल संघ बेहरीनविरुद्ध फुटबॉल मालिका 22 ते 30 ऑगस्ट दरम्यान खेळणार असल्याचे लोदी यांनी सांगितले.

Leave a Comment