
पुणे : पोलिसांनी मागील आठवड्यात पुण्यामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील संशयिताचे रेखाचित्र तयार केले आहे. फरासखाना पोलीस स्टेशनच्या आवारात हा स्फोट झाला होता. त्यात सहा जण जखमी झाले होते.
पुणे बॉम्बस्फोटातील संशयिताचे रेखाचित्र प्रसिद्ध
या घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी 20 ते 25 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज गोळा केले होते. त्यातील एका फुटेजमध्ये दोन संशयित मोटरसायकलवरून जात असल्याचे दिसत आहेत. त्यापैकी एकाने फरासखान्याच्या आवारात मोटरसायकल पार्क केली होती. या संशयितांपैकी एकाचे रेखाचित्र रेखाटण्यात आले आहे.
रेखाचित्राच्या आधारावर आरोपींचा शोध घेण्यासाठी एटीएससह सर्व तपास यंत्रणांच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे रेखाचित्र अधिकृतपणे जरी करण्यात आलेले नसले तरी स्फोटाशीच संबंधित असल्याचं सूत्रांनी सांगितले आहे.
