मायक्रोमॅक्सचे दोन स्मार्टफोन लवकरच बाजारात

micromax
नवी दिल्ली: भारतीय कंपनी मायक्रोमॅक्स लवकरच स्मार्टफोनच्या स्पर्धेत धमाल उडवून देणार आहे. कारण मायक्रोमॅक्स लवकरच आपले दोन नवे स्मार्टफोन बाजारपेठेत लाँच करण्याची शक्यता आहे. मायक्रोमॅक्सचे हे फोन्स कॅनवस सिरीजचे आहेत.

मायक्रोमॅक्सच्या ऑफीशीयल साईटवर याबाबतची माहिती दिली आहे. मात्र मायक्रोमॅक्सने अद्याप याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

काही महिन्यांपूर्वी मायक्रोमॅक्सने डुएट आणि कॅनवस एचडी प्लस स्मार्टफोनला एका ऑनलाईन रिटेलरच्या माध्यमातून विक्री केली होती. मायक्रोमॅक्स डुएट आणि कॅनवस एचडीचे फीचर्स पुढीलप्रमाणे.

कॅनवस डुएटचे फिचर्स- कॅनवस डुएटमध्ये (GSM+CDMA) असे दोन प्रकारचे सिम सपोर्ट दिले आहेत. हा स्मार्टफोन 4.1. 2 अँड्रॉईड जेलीबीन वर्जनवर चालतो. कॅनवस डुएट AE90 मध्ये 4.5 इंचाचा डिस्प्ले आहे. यामध्ये 1.2 गीगाहर्ट्ज क्वार्डकोर क्वॅलकॉम 200 चा प्रोसेसर. फोनची रॅम 1 जीबी इतकी आहे. एलईडी फ्लॅशसह 5.0 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा तसंच 0.3 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याचा समावेश यामध्ये आहे. यामध्ये 4 जीबी इंटरनल मेमरी असून 32 जीबी पर्यंतचे मायक्रो एसडी कार्ड बसवता येते. फोनची बॅटरी 1800 एमएएच अशी असून साडेपाच तासाचा टॉकटाईम आणि 150 तासाचा स्टॅण्डबाय टाईम मिळतो आहे. या फोनमध्ये ब्लूटूथ, वाई-फाई, जीपीएस, मायक्रो-यूएसबी आणि 3G सारख्या गरजेच्या फीचर्सचा समावेश आहे.

मायक्रोमॅक्स कॅनवस एचडी प्लसते फीचर्स- हा फोन ड्यूएल सीम सपोर्ट आहे. 4.4.2 अँड्रोईड किटकॅटचा याला सपोर्ट आहे. हा फोन मायक्रोमॅक्सच्या बोल्ट A069, माइक्रोमॅक्स कॅनवस एंगेज, यूनाइट-2 आणि नुकताच प्रकाशित झालेला कॅनवस गोल्ड की सारखाच आहे.कॅनवस एचडी प्लसमध्ये पाच इंचाचा एचडी डिस्प्ले आहे. ऑनलाईन रिटेलरच्या माहितीनुसार यामध्ये गोरिल्ला ग्लासची सुरक्षा दिली आहे. यामध्ये 1.5 गीगाहर्ट्झचा हेक्साकोर मीडियाटेक प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये एक जीबीची रॅम आहे. यामध्ये आठ जीबीची रॅम आहे. आठ जीबी इंटरनल मेमरी 8 जीबी इतकी असून 32 जीबीपर्यंतचे मायक्रो एसडी कार्ड बसते. यामध्ये एलईडी फ्लॅशसह आठ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तसेच 2 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. यामध्ये 2000 एमएएचची बॅटरी असून त्याची क्षमता सात तासापर्यंतची आहे. कॅनवस एचडी प्लस हा फोन मायक्रोमॅक्सचे पॉप्यूलर झालेला कॅनवस एचडी A116 आणि याच वर्षी लाँच झालेला कॅनवस एचडी A116i या मॉडेलचं पुढचं वर्जन असल्याचं बोललं जात आहे.

आता हा नवा स्मार्टफोन मायक्रोमॅक्सला किती प्रतिष्ठा मिळवून देतो याची प्रतिक्षा साऱ्यांना लागली आहे.

Leave a Comment