अमित शहांना नागपुरात काँग्रेसचा काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न

amit-shah
नागपूर : युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी नागपुरात आलेल्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी ताब्यात घेतले व झेंड्यांसह बॅनर जप्त केले, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

भाजप कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी नागपुरात आगमन झाल्यानंतर विमानतळावर शहा यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर शहा यांचा ताफा दीक्षाभूमीसाठी रवाना झाला. नागपुरातील वर्धा रोडवर राजीवनगर चौकात मंदिराजवळ ताफा आला असता युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आधीच साध्या वेशात दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष व अन्य कार्यकर्ते राजीव नगर चौकात जमले. त्यांनी सोबत आणलेले काळे झेंडे व शहा विरोधी घोषणा लिहिलेले बॅनर सोबत लपवून ठेवले होते.

दुपारी १२ च्या सुमारास शहा यांचा ताफा समोरून येताना दिसताच कार्यकर्त्यांनी झेंडे बाहेर काढले. मात्र, युवक काँग्रेसच्या हालचाली लक्षात येताच दबा धरून बसलेल्या ३0 ते ४0 पोलिसांनी त्यांना लगेच ताब्यात घेतले. सर्व झेंडे जप्त केले. काहींना पोलीस व्हॅनमध्ये बसवून मागच्या गल्लीत नेऊन सोडले. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना विरोध केल्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

Leave a Comment