मुंबईसह कोकणाला धोक्याचा इशारा

rain
मुंबई – कोकण किनारपट्टीवर पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंदुधुर्ग जिल्ह्याला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात रात्री मुसळधार पडणाऱ्या पावसाने आज सकाळी थोडी विश्रांती घेतली तरी पावसाचा जोर पून्हा वाढला आहे.

मुसळधार पावसामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्या सुमारे १० ते १५ मिनीटे उशीराने धावत आहेत. तर मुंबईत दादर, सायन, कुर्ला, घाटकोपर, चेंबूर, अंधेरी आदी सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे.

Leave a Comment