नितेश राणेंच्या गाडीवर दगडफेक

nitesh-ranes
सिंधुदूर्ग – अज्ञात इसमांकडून स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष व नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे. मंगळवारी रात्री मालवण जवळ ही घटना घडली. यात एक कार्यकर्ता जखमी झाला आहे.

सिंधुदुर्ग मध्ये ओरोस रानबांबुळी येथे काही अनोळखी इसमांनी नितेश राणे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर मंगळवारी रात्री दगड फेक केली. ताफ्यातील एका सुमो गाडीची काच फुटून एक कार्यकर्ता किरकोळ जखमी झाला आहे.

नितेश राणे सुखरूप असून त्यांनी ओरोस पोलिस स्टेशन मध्ये जाऊन या घटनेची कल्पना पोलिसांना दिली. नितेश कणकवलीहून मालवण जात असताना प्रकार घडल्याच त्यांनी सांगितले. मात्र, या बाबत अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

दरम्यान राजकीय दृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गमध्ये पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.