
रिओ दी जनैरो – फिफा फूटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जर्मनीकडून अर्जेन्टाईन टीमला १-० ने पराभव स्वीकारावा लागला असला तरी, अर्जेन्टाईन कॅप्टन लिओनेल मेसीला या फिफा फूटबॉल विश्वचषकाचा ‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’ खिताबाने गौरवण्यात आले.
मेसी ‘गोल्डन बॉल’ तर नोया ‘गोल्डन ग्लोव्ह’चा मानकरी
मेसीने या विश्वचषकामध्ये चार गोल झळकावले. या वर्ल्ड कपमध्ये त्याचीच सर्वोत्तम फुटबॉलर म्हणून अखेर निवड झाली. मेसी हॅमेज रॉड्रीगेज, जर्मनीचा थॉमस मुलर आणि नेमार या तिघांना मागे टाकत गोल्डन बॉलचा मानकरी ठरला.
कोलम्बियाचा स्टार फुटबॉलर हॅमेज रॉड्रीगेज यावर्ल्ड कपचा खऱ्या अर्थाने सरप्राईज पॅकेज ठरला. कोलम्बियाच्या या २२ वर्षीय फुटबॉलपटूने विश्वचषकामध्ये तब्बल सहा गोल झळकावण्याची किमया साधली. आपल्या डेब्यू विश्वचषकामध्येच त्याने सर्वोत्तम खेळ करत साऱ्यांचच लक्ष वेधून घेतले. या वर्ल्ड कपमध्ये दन दना दन साहा गोल झळकावल्यामुळे त्याला गोल्डन बूटच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
या फुटबॉल विश्वचषकाचा रॉड्रीगेज फाईंड ठरला आहे. न्यू फुटबॉल स्टार इज बॉर्न असे त्याने या विश्वचषकामध्ये साऱ्यांनाच दाखवून दिले आहे.
