ब्राझीलीयन कोचची हकालपट्टी

scolri
रियो दि जिनेरिओ: फिफा फूटबॉल विश्वचषकात संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर ब्राझीलचे कोच फिलीप स्कॉलरी यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

फिफा फूटबॉल विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतमध्ये ब्राझीलला जर्मनीकडून ७-१ असा मानहानीकारक पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर सर्व स्तरांतून स्कॉलरींवर टीका झाली होती. तर वर्ल्डकपमधील तिसऱ्या स्थानासाठीच्या झालेल्या मॅचमध्येही नेदरलँड्सने ब्राझीलचा ३-० असा पराभव केला. यामुळे स्कॉलरी यांच्यावर कारवाई होणे अटळ होते. अखेर त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली.

स्कॉलरी यांच्या नेतृत्वाखाली ब्राझीलने २००२ साली फिफा विश्वचषक पटकावला होता. तर यंदा जर्मनीने 24 वर्षांनंतर वर्ल्डकप जिंकलेला आहे.

Leave a Comment