राज ठाकरेंचे घुमजाव; म्हणे टीका मोदींवर नाही सोशल मीडियावर

raj
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदी यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यावरून घुमजाव करीत आपण सोशल मीडियाबाबत केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असून, नरेंद्र मोदींची लाट विरली असे आपण बोललो नव्हतो असा खुलासा केला आहे.

सोशल मीडियावर मी टीका केली होती आणि मी मोदींवर टीका केलेलीच नाही, असे राज ठाकरे म्हणालेत. दोनच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यक्रमात ‘चल हट मोदी कही के…’असा एक जोक ऐकवला होता.

रविवारी मनसेकडून मोफत वाय-फाय सेवेचे राज ठाकरेंनी उद्घाटन केले, तेव्हा ते बोलत होते. मी मोदींवर टीका केली नाही. मी फक्त एवढच बोललो की, सोशल मीडियावरसुद्धा मोदींची खिल्ली उडवली जात आहे. मी फक्त त्यातील एक विनोद सांगितला होता. माझे वक्तव्य हे सोशल मीडियाबाबत होते, मोदींबाबत नाही. तसेच त्या मेळाव्यातील संपूर्ण भाषणाचे रेकॉर्डींग माझ्याकडे आहे, असे स्पष्टीकरणही राज यांनी दिले.

Leave a Comment