विवाहबध्द झाला नोवाक योकोविक

novak
स्वेटी स्टीफन – आपली मैत्रीण जेलेना रिस्टिकसोबत यंदाच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील चॅम्पियन आणि जगातील नंबर वन टेनिसपटू नोवाक योकोविक विवाहबद्ध होणार आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेमप्रकरणानंतर हे दोघे सात फेरे घेणार आहेत.

एड्रियाटिकच्या क्रालजिसिनाच्या बीचवरील एका पंचतारांकित हॉटेलात हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी आपल्याच परिचयातील मोजके नातेवाईक आणि मित्रांनाच योकोविकने आमंत्रण दिले आहे. अत्यंत साध्या पद्धतीने हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यानंतर दोन दिवसांनी धार्मिक विधी पार पडणार आहे.

Leave a Comment