
इस्लामाबाद – पाकिस्तान सरकारने क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांना पदावरून पायउतार केले आहे. माजी न्यायाधीश जमशेद अली शाह यांची त्यांच्या जागी प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शाह यांची नियुक्ती एका महिन्यासाठी केली असल्याचे पाकिस्तान सरकारकडून सांगण्यात आले.
पाक क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरून नजम सेठीचा पायउतार
पी.सी.बी चे नवे संविधान बनविण्यात आले असून, याच आधारावर येणाऱया काही दिवसांमध्ये निवडणुका होतील. शाह हेच या निवडणकीचे प्रमुख असतील, असे पाकिस्तान सरकारने सांगितले. सेठी यांच्या अखत्यारित स्थापन केलेली समिती कायम ठेवण्यात आली असून, शहा यांच्या अध्यक्षतेखाली ती कार्यरत राहिल. शाह आणि त्यांच्या समितीला पी.सी.बी च्या नव्या संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी एका महिन्याचा अवधी देण्यात आला आहे.
