युनुस खानचे पाक संघात पुनरागमन

yunus
कराची – पाक क्रिकेट संघाची श्रीलंकेविरुद्ध होणार्‍या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी घोषणा करण्यात आली असून, उमर गुल व मोहम्मद इरफान या वेगवान गोलंदाजांना फिटनेसच्या समस्येमुळे संघातून वगळण्यात आले आहे, तर अनुभवी फलंदाज युनुस खानने संघात पुनरागमन केले आहे.

२०१३ नंतर प्रथमच युनुस खानला एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे. उमर गुल आणि इरफान पूर्णपणे तंदुरुस्त नाहीत आणि त्यामुळेच निवड समितीने धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला, असे निवड समितीचे अध्यक्ष मोईन खान यांनी सांगितले. अष्टपैलू मोहम्मद हफीझ यालाही कसोटी संघात स्थान देण्यात आले नाही. दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या उमर गुलच्या गुडघ्यावर गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु, त्याला पुन्हा त्रास सुरू झाला आहे. इरफान शस्त्रक्रियेनंतर अजून पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. युनुस खानने २०१५ ची विश्‍वचषक स्पर्धा खेळण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे निवड समितीने त्याचा वन डे संघात समावेश केला.

कसोटी संघ : मिसबा-उल हक (कर्णधार), अहमद शहजाद, खुर्रम मंझूर, शाह मसूद, अझहर अली, युनुस खान, असद शफीक, उमर अकमल, सर्फराज अहमद, सईद अजमल, अब्दुल रहमान, मोहम्मद ताल्हा, जुनैद खान, राहत अली, वहाब रियाझ
एकदिवसीय संघ : मिसबा-उल हक (कर्णधार), अहमद शहझाद, शर्जिल खान, मोहम्मद हफीझ, युनुस खान, उमर अकमल, फवाद आलम, शोएब मकसूद, शाहिद आफ्रिदी, अन्वर अली, सईद अजमल, मोहम्मद ताल्हा, जुनैद खान, वहाब रियाझ, झुल्फिकार बाबर.

Leave a Comment