विद्यार्थ्याचा डोळा शिक्षिकेने फोडला

eye
ठाणे – एका विद्यार्थ्याच्या डोळ्याला शिक्षिकेने उलट छत्री फेकून मारल्याने गंभीर इजा झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ठाण्यातील सावरकरनगरमधील ज्ञानोदय विद्यालयात हा प्रकार घडला आहे.

अंकित कामथाप्रसाद शर्मा असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मारहाण करणारी शिक्षिका अद्याप मोकाट आहे. अंकितवर कळवा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसात तक्रार नोंदवूनही पोलिसांनी अद्याप काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे जखमी मुलाचे पालक न्यायासाठी वणवण भटकत आहेत.

Leave a Comment