बांग्लादेशात निर्वासित मुस्लीमांसोबत विवाहास बंदी

bang
ढाका : बांग्लादेश सरकारने देशातील मुस्लीमांना निर्वासित मुस्लीमांसोबत विवाह करण्यास बंदी घातली आहे. या निर्वासित मुस्लीमांना बांग्लादेशचे नागरिकत्व मिळू नये, यासाठीच ही बंदी घालण्यात आली आहे.

विवाह नोंदणी निबंधकांना बांग्लादेशचे कायदामंत्री सय्यद अनीसूल हक यांनी अशा विवाहाची नोंदणी करू नये, असे आदेश दिले आहेत. बांग्लादेशात निर्वासित मुस्लीमांची संख्या मोठी असून, ते शरणार्थी शिबीरात राहतात. स्थानिक बांग्लादेशी मुस्लीमांसोबत रोटी-बेटी व्यवहार करून बांग्लादेशचे नागरिकत्व मिळविण्याचा प्रयत्न निर्वासित मुस्लीमांकडून होत असल्यानेच ही बंदी घालण्यात आल्याचे हक यांनी म्हटले आहे.

Leave a Comment