मुंबईत शस्त्रसाठा जप्त ;दोघांना जखडले

weapon
मुंबई – उत्तरप्रदेशातून मुंबईत आणण्यात आलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. हा शस्त्रसाठा मुंबईत आणणाऱ्या दोघांना मुंबई गुन्हे शाखा ९च्या पथकाने अटक केली आहे. हा शस्रसाठा मुंबईतील एका गँगस्टरला देण्यासाठी आले असल्याची माहिती मिळत आहे.

शेरखान बिसमिल्ला खान आणि शाहिद खान उर्फ पप्पु या दोघांनी मुंबईत शस्त्रसाठा आणला आहे. हे दोघे आरोपी उत्तरप्रदेशातून शस्रसाठा आणणार असल्याची माहीती मुंबई गुन्हे ९ च्या पथकाला मिळाली होती.

यावेळी पोलिसांनी सापळा रचून खार स्मशानभूमी जवळ या दोघा आरोपींना शस्त्रांसह अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी ४ रिव्हॉलवर आणि ७ जिवंत काडतूसांसह दोघांना अटक केली आहे. हा शस्त्रसाठा नेमका कोणाला देण्यासाठी आणला होता याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Leave a Comment