दोन गावे अशी ,घरी एक तरी बाउन्सर

bouncer
दिल्लीजवळ पारंपरिक उद्योगांऐवजी नवे व्यवसाय आत्मसात केलेली दोन गावे गावे वसली आहेत. या गावांतील प्रत्येक तीनपैकी एक तरुण बाउन्सर (पब वा क्लबमध्ये गोंधळ घालणार्‍यांना बाहेर घालवून देणारा सेवक) आहे. असोला-फतेहपूर बेरी अशी या गावांची नावे असून तिथे जवळपास प्रत्येक घरांमध्ये किमान एक मुलगा बाउन्सरचे प्रशिक्षण घेत आहे. हा आगळ्य़ा प्रकारचा व्यवसाय स्वीकारल्यापासून या गावची परिस्थिती पूर्वीपेक्षा कितीतरी पालटली आहे. शेतात राबणारे तिथले गरीब तरुण आता चांगला पगार मिळविणारे बाउन्सर बनले आहेत. गावातील ९0 टक्क्यांहून जास्त पुरुष दिल्लीतील शेकडो पबमध्ये बाउन्सरचे काम करत आहेत. या गावात असा एक मुलगा सापडणार नाही, तो व्यायामशाळेत गेलेला नाही, अशी माहिती असोला गावातील एका तालिमीचे प्रमुख ट्रेनर विजय पहिलवान यांनी सांगितले. गावातील मुले बालपणापासूनच व्यायामशाळेत जाण्यास सुरुवात करतात. तिथे घाम गाळून प्रत्येकजण आपले शरीर पीळदार बनविण्यासाठी धडपडत असतो. या दोन्ही गावांमध्ये एकही व्यक्ती मद्यपान करत नाही तसेच तंबाखूचेही सेवन करत नाही. तालिमीत जाणार्‍या मुलांनी आपले ध्येय निश्‍चित केले आहे आणि शरीर बलदंड बनवून बाउन्सरची नोकरी मिळविणे.