कोकणात अतिवृष्टीचा इशारा

kokan
सिंधुदूर्ग – आषाढी एकादशीनंतर राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावण्यास प्रारंभ केला असून कोकणात मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. असाच पाऊस येत्या २४ तासात होणार आहे. त्यामुळे कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे
सध्या ९० मिमी पाऊस सिंधुदूर्गमध्ये झाला आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारी भागालाही धोक्याचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे. तसेच ताशी ४५-५० किलोमीटर या वेगाने वारा वाहण्याची शक्यात वर्तवण्यात आला आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याची सुचनाही वेधशाळेने दिली आहे. सध्या मच्छिमारी बंद आहे. तरीही काही मच्छिमार समुद्राच्या किनाऱ्यावर मासेमारी करतात. या किनारी भागावर मासेमारी करणाऱ्यांनी तसेच राहणाऱ्यांनीही पुढच्या २४ तास सर्तक रहावे असा इशाराही देण्यात आला आहे. तसेच २४ तास सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

मुंबई – गोवा महामार्ग ठप्प – मुंबई – गोवा महामार्ग सध्या ठप्प झाला आहे. पावसाने या महामार्गावर दरड कोसळली आहे. यामुळे वाहतुक ठप्प झाली आहे.संगमेश्वर येथे गोवा महामार्गावर दरड कोसळल्यामुळे मार्ग ठप्प झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काल पासून मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे.त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगड जिल्ह्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कालपासून कोकणाला पाऊस झोडपून काढत आहे.

मुंबईत १०१ मीमी पावसाची नोंद – मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. मागील २४ तासांत कुलाबा वेधशाळेने १०१ मीमी पावसाची नोंद केली आहे. तर, सांताक्रुज केंद्रात ४७ मीमी पावसाची नोंद झाली आहे.आज दिवसभर संततधार पाऊस सुरू राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे दादर, हिंदमाता, घाटकोपर, चेंबूर आदी परिसरात पाणी साचले आहे.

Leave a Comment