भुवनेश्वर-शमीचा चिवट प्रतिकार

india
नॉटिंघम – मोहम्मद शमीने भुवनेश्वर कुमारसह अखेरच्या विकेटसाठी विक्रमी शतकी भागीदारी नोंदविल्यानंतर आज इंग्लंडला पहिल्या डावात सुरुवातीलाच धक्का देत भारताला पहिल्या कसोटी सामन्यात वर्चस्व मिळवून दिले.

भुवनेश्वर कुमार व मोहम्मद शमी यांनी भेदक मारा करीत इंग्लंडच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजविले. शमीने इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुकला (5) बोल्ड केले. दुस:या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी इंग्लंडने 1 बाद 43 धावांची मजल मारली होती. दिवसअखेर सॅम रॉबसन (2क्) आणि गॅरी बॅलेन्स (15) खेळपट्टीवर आहेत.

त्याआधी, भुवनेश्वर कुमार (58) व मोहम्मद शमी (नाबाद 51) यांनी अखेरच्या गडय़ासाठी केलेल्या 111 धावांच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 457 धावांची मजल मारली. भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची दमछाक करीत उपाहारार्पयत कालचा नाबाद शतकवीर मुरली विजय (146 धावा) याला गमवून 5 बाद 342 अशी मजल गाठली.

भारताने सकाळी 4 बाद 259 वरून पुढे धोनी आणि विजय यांनी खेळ सुरू केला. मॅट प्रायरने ङोल सोडून धोनीला 52 धावांवर असताना जीवदान दिले. 11 व्या षटकांत विजय-धोनी यांनी शतकी भागीदारी पूर्ण केली. विजयला अँडरसनने पायचित करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. टीव्ही रिप्लेत मात्र हा चेंडू यष्टीच्या वरून जात असावा असे दिसत होते. विजयने 361 चेंडू टोलवून 25 चौकार व एक षट्कार मारला.

रविंद्र जडेजाला स्टुअर्ट बिन्नीच्या आधी संधी मिळाली. जडेजा (25) आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. शतकाकडे वाटचाल करणारा कर्णधार धोनी (82) अँडरसनच्या थेट फेकीवर धावबाद झाला. त्यानंतर मात्र भारताची 6 बाद 344 धावसंख्येवरुन 9 बाद 346 अशी घसरगुंडी उडाली. त्यानंतर मात्र भुवनेश्वर व शमी यांनी डाव सावरला.

Leave a Comment