ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे २२४ जणांचे पथक

common
नवी दिल्ली – ग्लासगो येथे होणा-या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारत यंदा २२४ जणांचे पथक पाठवणार आहे. येत्या २३ ते तीन ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.

क्रीडा मंत्रालयाने १४ क्रीडाप्रकारांसाठी २२४ जणांची निवड केली आहे. यासोबत ९० अधिकारी, प्रशिक्षक आणि सहाय्यक असणार आहेत. ग्लासगो येथे होणा-या या स्पर्धेत एकूण १७ क्रीडाप्रकार असून यात २६१ पदके जिंकण्याची संधी आहे.

याआधीची राष्ट्रकूल क्रीडास्पर्धा २०१०मध्ये नवी दिल्लीत झाली होती. त्याच २१ क्रीडा प्रकार आणि २७१ पदके होती. त्यावेळी भारताने ४९५ क्रीडापटूंना स्पर्धेत उतरवले होते.

इतक नव्हे तर भारताने या स्पर्धेत विक्रमी ३८ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३६ कास्य अशी १०१ पदके मिळवली होती. पदक तालिकेत भारत ऑस्ट्रेलिया पाठोपाठ दुस-या स्थानावर होता. गेल्या स्पर्धेत मिळालेल्या या यशामुळे या ही स्पर्धेत भारताची कामगिरी चांगली होण्याची आशा आहे.मैदानी क्रीडाप्रकारासह नेमबाजीमध्ये भारत सर्वाधिक सुवर्ण पदके मिळवण्याची शक्यता आहे. यासाठी भारताने ३० खेळाडू सज्ज आहेत.

Leave a Comment