
लंडन – आजपासून भारताविरुद्ध सुरू होणाऱया कसोटी मालिकेत इंग्लंडच्या विजयासाठी माजी अष्टपैलू इयान बोथमकडून महत्त्वाच्या टिप्स् मिळाल्या आहेत. इयान बोथमने ही आगामी मालिका इंग्लंडचा संघ जिंकेल असे भाकीत केले आहे.
इंग्लंडच मालिका जिंकेल; बोथम यांचा आत्मविश्वास
इंग्लंडचा भारतीय संघाला नेहमीच दौरा खडतर ठरतो. भारतीय खेळाडूंची इंग्लंडमधील हवामान आणि खेळपट्टय़ा यांच्याशी जुळवून घेताना खूप कसरत असते. कूकच्या इंग्लंड संघाला बोथमकडून भारतीय खेळाडूंची ही कमकुवत बाजू असून या संधीचा पूरेपूर फायदा घेण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स् मिळाल्याचे समजते. या मालिकेत ऍण्डरसन भारतीय फलंदाजांना डोकेदुखी ठरेल, असेही बोथमने म्हटले आहे.
