कर्क रुग्णांच्या मदतीसाठी सचिनच्या टी-शर्टचा लिलाव

yuvraj
लंडन – कर्क रुग्णांच्या मदतीसाठी युवराज सिंगने विविध क्रिकेट साहित्याचा लिलाव लंडन हिल्टन पार्क लेन येथे १४ जुलै रोजी आयोजित केला आहे. भारतीय संघातील विराट कोहली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरभ गांगुली तसेच इंग्लंडचा केवीन पीटरसन या लिलावावेळी उपस्थित राहणार आहेत.
सचिन तेंडुलकरने आपल्या द्विशतकी कसोटीत परिधान केलेल्या टी-शर्टचा या लिलावामध्ये समावेश राहील. २०११च्या विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपदाचे पदक व अन्य क्रिकेट साहित्याचा लिलाव केला जाईल. या लिलावात सहभागी होणाऱया इच्छुकांना क्रिकेटपटूंसमवेत मेजवानीची संधी देखील लाभेल. या लिलावातून मिळणारी रक्कम युवराजसिंगच्या कॅन्सर चॅरेटीला दिली जाणार आहे. प्रख्यात भारतीय विनोदी कलाकार कपिल शर्मा याचा खास शो या समारंभावेळी आयोजित केला आहे.

Leave a Comment