
लंडन – जर्मनीच्या मार्सेल किटेलने टूर डी फ्रान्स सायकलिंग स्पर्धेतील तिसरा टप्पा जिंकला आहे. १५५ किलोमीटर पल्ल्याच्या या टप्प्यात जर्मनीच्या २६ वर्षीय किटेलने आपल्या नजीकच्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. किटेलने यापूर्वी या शर्यतीतील दुसरा टप्पाही जिंकला होता. तिसऱ्या टप्प्यात स्लोव्हाकियाचा सॅगेन दुसऱ्या तर ऑस्ट्रेलियाचा रेनाशॉ तिसऱ्या क्रमांकावर राहिला. इटलीचा नेबालीने या स्पर्धेत आतापर्यंत सर्वंकश आघाडी घेत यलो जर्सी मिळविली आहे.
