
नवी दिल्ली – सानिया मिर्झाने विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील चमकदार कामगिरीच्या बळावर टेनिस दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत पाचव्यास्थानी मजल मारली. तिचे हे आतापर्यंतच्या करिअरमधील सर्वोत्तम रॅकिंग आहे.
दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत पाचव्यास्थानी सानिया
२००३मध्ये व्यावसायिक टेनिस खेळणा-या सानियाने झिम्बाब्वेची आपली सहकारी कारा ब्लॅकसोबत विम्बल्डनच्या दुस-या फेरीपर्यंत मजल मारली होती. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या टेनिसच्या क्रमवारीत ती १३० गुणांसह पाचव्या स्थानी पोहोचली आहे.
मला मनगटाला झालेल्या दुखापतीतून सावरण्यासाठी खूप वेळ लागला. तीन सर्जरीनंतर मेहनतीच्या जोरावर मला हे स्थान मिळाले आहे. टॉप ५ मध्ये सहभागी झाल्याने मी खूप आनंदी असल्याचे सानिया मिर्झाने सांगितले.
