टीम इंडियाला आयसीसी रँकिंगमध्ये सुधारणा करण्याची संधी

team-india
दुबई – इंग्लंडमध्ये नऊ जुलैपासून सुरु होत असलेल्या कसोटीत भारताला क्रमवारीत आपले स्थान सुधारण्याची संधी असून या भारताने कसोटी मालिकेत इंग्लंडला पराभूत केल्यास या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर कब्जा करू शकतो.

कसोटी क्रमवारीत सध्या १०२ गुणांसह भारत चौथ्या स्थानी आहे. तर १०० गुणांसह इंग्लंड पाचव्या स्थानी आहे. या कसोटीतील कामगिरीचा परिणाम दोन्ही संघाच्या क्रमवारीत होऊ शकतो.

या मालिकेतील पाचही सामने भारताने जिंकल्यास सातव्या स्थानी इंग्लंड संघाची घसरण होईल. जर भारताने ही मालिका ४-१ ने जिंकली तर इंग्लड सहाव्या स्थानी पोहोचेल. त्याचप्रमाणे जर इंग्लंडने ही मालिका ४-० ने जिंकली तर भारत सातव्या स्थानी घसरेल.

या दौ-यातील कामगिरीचा परिणाम जसा संघाच्या क्रमवारीवर पडणार आहे त्याचप्रमाणे खेळाडूंच्या क्रमवारीवरही होईल. भारताचा चेतेश्वर पुजारा सध्या सातव्या स्थानी आहे. त्याची या मालिकेत कामगिरी चांगली राहिल्यास टॉप पाच मध्ये तो स्थान पटकावू शकतो. तर विराट कोहली सध्या १० व्या स्थानावर आहे. या कसोटी मालिकेत त्याने दमदार खेळी के्ल्यास त्याते टॉप १० मधील स्थान पक्के होईल.

इंग्लंडकडून इयान बेल हा एकमेव खेळाडू कसोटी क्रमवारीत १८ व्या स्थानावर आहे. टॉप २० व्यतिरिक्त एलेस्टर कूक(२१), जो रुट(२६), महेंद्रसिंग धोनी(२९), रोहित शर्मा(३३), मुरली विजय(४२), अजिंक्य रहाणे(४५) आणि शिखर धवन (५०) व्या स्थानावर आहेत.

Leave a Comment