
नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियाची तिहेरी ऑलिम्पिक विजेती जलतरणपटू स्टिफेनी राईसचे यापुढे भारतीय जलतरणपटूंना महत्त्वाचे मार्गदर्शन लाभणार आहे. २५ वर्षीय स्टिफेनी राईसची भारतीय जलतरणपटूंचा दर्जा सुधारण्यासाठी नियुक्ती एका क्रीडा व्यवस्थापन समूहाने केली आहे.
भारतीय जलतरणपटूंना लाभणार राईसचे मार्गदर्शन
आपल्या वैयक्तिक जलतरण कारकिर्दीत अव्वल कामगिरी करत जगाचे लक्ष स्टिफेनी राईसने स्वतःकडे वेधून घेतले होते. आंतरराष्ट्रीय जलतरण क्षेत्रातून गेल्या एप्रिलमध्ये तिने निवृत्ती पत्करली. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये राईसने जलतरणातील विविध प्रकारामध्ये विश्वविक्रमासह अनेक सुवर्णपदके मिळविली. भारतामध्ये क्रीडा अकादमी स्थापन करण्याची योजना राईसने आखली असून रिती स्पोर्टस् या क्रीडा व्यवस्थापन फर्मने भारतीय जलतरणपटूंचा दर्जा सुधारण्यासाठी राईसला मार्गदर्शक म्हणून संधी दिली आहे.
