तालिबान्यांवरील हल्ल्यांमुळे लाखो पाक नागरिक बेघर

pak
इस्लामाबाद- पाकिस्तान सरकारने उत्तर वझीरीस्तानात केलेल्या दहशतवादी विरोधातील सैन्य कारवाईमुळे या भागातील १ लाखांहून अधिक पाकिस्तानी नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. त्यातील बहुसंख्य नागरिकांनी अफगाणिस्तानात आश्रय घेतला आहे असे संयुक्त राष्ट्र शरणार्थी मदत संस्थेने जाहीर केले आहे.

या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार या लक्षावधी बेघर लोकांना अन्न, पाणी व अन्य जीवनावश्यक सुविधा पुरविण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या शरणार्थी संस्थेचे उच्चायुक्त, विश्व खाद्य संघटन प्रयत्नशील आहेत. मात्र तरीही स्वच्छ पाणी आणि जीवनावश्यक औषधे पुरविण्यात अडचणी येत आहेत.

Leave a Comment