एअरफोर्स ने आणला थ्रीडी मोबाईल गेम

airforce
दिल्ली – देशातील तरूणाईने देशसेवेसाठी कटिबद्ध असलेल्या भारतीय वायुदलाकडे आकर्षित व्हावे या उद्देशाने भारतीय वायुदलाने प्रथमच थ्रीडी मोबाईल गेमची निर्मिती केली आहे. गार्डीयन्स ऑफ द स्काय या नावाने आलेल्या या गेममध्ये झारूझिया या काल्पनिक देशाकडून झालेल्या आक्रमणाचा प्रतिकार करण्यासंबंधीचा खेळ असून या मुळे युजरला पहिली व्हर्च्युअल सॉर्टी केल्याचा अनुभव मिळू शकणार आहे.
भविष्यातली देशापुढे येणारी सुरक्षा आव्हाने लक्षात घेऊन एका खासगी व्हेंडारने हा गेम तयार केला असल्याचे समजते. बुधवारी या गेमची पहिली फेज लाँच करण्यात आली असून दुसरी फेज आकटोबरमध्ये लाँच केली जाणार आहे.

या विषयी माहिती देताना एअर मार्शल एस.सुकुमार म्हणाले की आजही वायुदलाकडे येणार्‍या तरूणांची संख्या चांगली आहे मात्र आम्हाला बेस्ट तरूण मुले आणि मुली हव्या आहेत. या गेमच्या माध्यमातून देशातील बुद्धीमान आणि देशप्रेमी तरूण वायुदलाकडे आकर्षित होतील असा विश्वास आहे. आम्ही रोजचा जीवनात जो थरार अनुभवतो त्याचा अनुभव युजर या गेममध्ये घेऊ शकणार आहेत.

हा गेम अँड्राईड, विंडोज व आयओएस सिस्टीमवर मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Leave a Comment