संगणक थंड ठेवणारा द्रव विकसित

computer
कॉम्प्युटरचा रोजच्या जीवनातील वापर आता अत्यावश्यक ठरला आहे. मात्र संगणक अथवा तत्सम उपकरणे अतिवापराने तापतात. परिणामी त्याचा वेग मंदावतो अथवा कांही वेळा संगणक बंदच पडतात. यावर क्वालालंपूर मधील मलाया विद्यापीठातील संशोधकांनी संशोधन केले असता त्यांना असे नॅनो पार्टिकल सापडले जे संगणक थंड ठेवू शकतात.

संशोधन करणारे प्रो. रहमान सैदूर म्हणाले की डेस्कटॉप व कॉम्प्युटरच्या मुख्य फ्रेमच्या आत असलेल्या छोट्या भागांवर दाब येत असतो कारण हेच छोटे भाग आपल्याला प्रचंड डेटा उपलब्ध करून देण्यात मदत करत असतात. डेटा देवाणघेवाणीमुळे ते तापतात व हे भाग नाजुक असल्याने कांही वेळा संगणक बिघडतो. आम्ही असे नॅनो फ्यूईड पार्टीकल शोधले आहेत जे इलेक्ट्रोनिक उपकरणे थंड ठेवण्यास मदत करतात. हे पार्टिकल कुलंट म्हणून फार महत्त्वाची कामगिरी संगणकात बजावतात. परिणामी गरम झाल्याने संगणक बिघडण्याचा धोका नाहीसा होतो.

Leave a Comment