स्वतःचे मत मांडण्यासाठी प्रीतीने घेतला फेसबुकचा आधार

preity
मुंबई – अभिनेत्री प्रीती झिंटाने विनयभंगाच्या प्रकरणावरून आपले मत मांडण्यासाठी फेसबुकचा आधार घेतला आहे.

प्रीतीवर या प्रकरणामुळे होत असलेल्या टिपणीवर तिने नाराजी व्यक्त केली. मी प्रकरण पैसा आणि प्रसिद्धीसाठी बाहेर काढलेले नाही. आयपीएल माझा सुरूवातीपासूनच प्रोजेक्ट होता. आयपीएलच्या लिलावावेळी मी व नेसने पाच करोड रूपये लावल होते. जर पैसे कमवणे हे माझ्या नितीमत्तेत नव्हते आणि हेच माझे ध्येय असते तर मी स्वर्गीय शानदार अमरोही यांची संपत्ती का नाकारली असती, असा प्रश्नही प्रीतीने उपस्थित केला. मी अनेक ब्लॉकबास्टर सिनेमे केले आहे. त्यामुळे मला लोकप्रियता आणि संपत्तीची नाही तर स्वताःच्या सुरक्षेची काळजी असल्याच्या भावना प्रीतीने फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

Leave a Comment