
मुंबई – अभिनेत्री राखी सावंतला स्वत:च्याच ‘राष्ट्रीय आम पक्ष’तर्फे लोकसभा निवडणुकीला उभ्या राहिलेल्या अपयश पत्करावे लागले. शनिवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात राखीने प्रवेश केला. पक्ष प्रवेशावेळी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले हेही उपस्थित होते.
राज ठाकरेंविरोधात लढणार राखी सावंत?
आगामी विधानसभा निवडणुकीत आपण रिपब्लिकन पक्षातर्फे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढविणार आहोत, असे अभिनेत्री राखी सावंतने जाहीर केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याची आपली महत्त्वाकांक्षा असून, महिलांची सुरक्षा आणि गरीब, दलित उपेक्षितांच्या प्रश्नावर आवाज उठविणार असल्याचे ती म्हणाली.
राखी सावंतला पक्षाच्या महिला आघाडीचे अखिल भारतीय कार्याध्यक्षपद देण्यात आले. विधानसभा निवडणुकीत त्या आमच्या पक्षाच्या स्टार प्रचारक असतील, असे आठवले यांनी सांगितले.
