
मुंबई – गायक सुरेश वाडकर यांना जामीन मालकी हक्क प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. त्यांच्या विरोधात हेमंत कोठीकर नावाच्या व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. कोर्टाच्या आदेशाने दोन दिवसांपूर्वीच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सुरेश वाडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर
नाशिक कोर्टाने त्यांना या प्ररकरणी १ जुलै पर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच न्यायालयाच्या परवानगी शिवाय संबधित भागात जाण्यास मनाई केली आहे. पुढील सुनावणी एक जुलैला होणार आहे.
आवश्यकते नुसार तपास अधिका-यांसमोर हजर राहण्याचे आदेशही कोर्टाने वाडकर यांना दिले आहेत.
