अखेर केमिस्ट असोसिएशनचा संप मागे

medical
पुणे – अखेर केमिस्ट असोसिएशनने पुकारलेला बंद मागे घेतला आहे. केमिस्ट असोसिएशनने अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) औषध दुकानदारांवर सुरु केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ हा बंद पुकारला होता. केमिस्ट्सच्या मागण्या मान्य करण्यात आल्याने गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला हा संप अखेर आज मागे घेण्यात आला आहे.

एफडीएकडून फार्मासिस्ट नसलेल्या दुकानांवर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई थांबवावी या मागणीसाठी गुरुवारी केमिस्ट असोसिएशनने एफडीएच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. या वेळी कारवाई करताना कोणती काळजी घ्यावी यासाठी अधिकारी व कर्मचा:यांची समिती स्थापन करण्याचे निश्चित करण्यात आले.

त्यानंतर असोसिएशनने बंद मागे घेतला आहे. मात्र, दुपारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या दुकानांची तपासणी करण्यासाठी एफडीएच्या अधिकाऱ्यांचे पथक पोचल्याचे वृत्त औषध दुकानदारांमध्ये पसरले. त्यानंतर शुक्रवार पेठेतील असोसिएशनच्या कार्यालयात औषध दुकानदारांनी गर्दी करीत बंद सुरु ठेवण्याची मागणी केली.

या सर्व प्रकारानंतर असोसिएशनने सायंकाळी बेमुदत बंदची घोषणा केली होती. त्यामुळे शहरातील सुमारे ७ हजार मेडिकल दुकाने बंद होती. यामुळे रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागला होता. अखेर आज हा संप मागे घेण्यात आला आहे.

Leave a Comment