
नवी दिल्ली : अॅपल प्रेमींना अॅपलचे प्रोडक्टस महाग असल्याने त्या वस्तू वापरता येत नाहीत. मात्र, आता अशाच ग्राहकांसाठी खूशखबर आहे.
आता अॅपलचा भारतात केवळ 16,900 रुपयांना 16 जीबी चा आयपॉड टच पोर्टेबल मीडिया प्लेयर उपलब्ध होणार आहे.
भारतात अॅपलचा स्वस्तातला आयपॉड दाखल
या आयपॉडमध्ये 5 मेगापिक्सल आयसाईट कॅमेरा असून तुम्ही त्याच्यासोबत 1080 पीएचडी व्हिडिओ रेकॉर्डिंग करु शकाल. या आयपॉडमध्ये रेटिना डिस्प्ले 4 इंच, ए5 चिप किंवा फेस टाईम कॅमेराही आहे.
32 जीबी कॅपेसिटी असलेल्या आयपॉडची किंमत 20,900 रुपये तर 64 जीबी असलेल्या आयपॉडची किंमत 24,900 रुपये आहे.
