एलजीचे नवे क्लासी स्मार्टवॉच लॉन्च

lg
सॅनफ्रान्सिस्को : अनेक उत्पादकांनी विविध वस्तूंचे लॉन्चिंग अमेरिकेत सॅनफ्रान्सिस्कोमध्ये झालेल्या I/O परिषदेत केले आहे. याच निमित्ताने ‘एलजी’ने देखील आपले स्मार्टवॉचही लॉन्च केले आहे.

याच टेक मेळाव्यात लॉन्च झालेले अॅन्ड्रॉईड 5.0.L, अॅन्ड्रॉईड ऑटो तसेच अनेक अॅन्ड्रॉईड, मोबाईल आणि फोन असे अनेक टेक्नोलॉजीचे नवीन प्रकार अशा अनेक प्रोडक्टस ग्राहकांना लवकरच वापरता येणार आहेत. याच वेळी एलजीने आपले स्मार्टवॉच लॉन्च करून ग्राहकांचे लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न केला आहे. एलजीचे हे वॉच ग्राहकांना गूगल प्ले वर उपलब्ध होईल.

‘एलजी’ स्मार्टवॉचची वैशिष्टये – 63 ग्रॅम वजन, 4 जीबी बिल्ट इन स्टोरेज, 512 रॅम, 400 मेगाहर्टझ बॅटरी, 4.0 ब्लू टूथ कनेक्टिविटी उपलब्ध आहे.
एलजीने या स्मार्टवॉचची किंमत साधारणतः 13,740 रुपये आहे. हे स्मार्टवॉच अॅन्ड्रॉईडवर चालते. जगातील 12 देशांतील लोकांना गूगल प्ले स्टेशनवरुन ऑर्डर देऊन हे स्मार्टवॉच विकत घेता येईल.

Leave a Comment