नेपाळचे पंतप्रधान कोईराला यांना कॅन्सर

koirala
काठमांडू- नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांना फुप्फुसाचा कॅन्सर झाल्याचे त्यांचे व्यक्तीगत डॉक्टर कबीरनाथ योगी यांनी सांगितले आहे. दहा दिवसांपूर्वीच ७५ वर्षीय कोईराला यांना अमेरिकेतील रूग्णालयात तपासण्यांसाठी पाठविले गेले होते. त्यांच्यावर नेपाळमध्ये उपचार होणे शक्य नसल्याने डॉ.कबीरनाथ यांनी त्यांना अमेरिकेला नेण्याचा सल्ला दिला होता.

अमेरिकेतील रूग्णालयात कोईराला यांच्या सर्व तपासण्या केल्या असताना त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाला असल्याचे निदान करण्यात आले असून त्यांना रेडिओ थेरपी देण्याची सुरवात केली गेली असल्याचेही समजते.

Leave a Comment