विंबल्डनमध्ये ड्रेस कोड वरून उसळला वाद

dress-code
विंबल्डन स्पर्धांवर यंदा दहशतवादी हल्ल्यांचे सावट असल्याचे सांगितले जात असताना येथे खेळाडूंच्या ड्रेसकोडवरूनही वादाचे रण पेटले आहे. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू पॅट कॅश याने स्पर्धांत महिला खेळाडूंना अंतर्वस्त्र न घालता खेळण्याची वेळ आली असल्याचा आरोप केला आहे.

या सबंधी मिळालेल्या माहितीनुसार गतवर्षीच सर्व खेळाडूंसाठी ड्रेस कोड ठरविताना ऑल व्हाईट असा नियम केला गेला होता. या मागे महिला खेळाडूंची घातलेली रंगीत अंतर्वस्त्रे खेळाडूंना खेळताना घाम आला की वरच्या पांढर्‍या शर्टमधून दिसतात असे कारण दिले गेले होते. मात्र तरीही यंदा अनेक महिला खेळाडूंनी रंगीत अंतर्वस्त्रेच वापरली.ऐनवेळी पांढरी अंतर्वस्त्रे हाताशी नसल्याने अंतर्वस्त्रे न घालता खेळण्यासाठी त्यांना सांगण्यात आले असा आरोप केला जात आहे.

२०१३ साली स्वीस टेनिसपटू रॉजर फेडरर याने पायात घातलेल्या पांढर्‍या नायकेच्या बुटांचा तळ नारंगी रंगाचा होता त्यामुळे त्यालाही बूट बदलण्यासाठी सांगण्यात आले होते आणि सेरेना विल्यम्स हिने रंगीत अंतर्वस्त्रे वापरली होती तेव्हा तिलाही अशी समज दिली गेली होती. कांही खेळाडूंनी या निमयाचे पालन करण्यात अडचण नसल्याचे सांगितले आहे तर बाकीच्यांनी या नियमाला आक्षेप घेतला आहे.

Leave a Comment