
न्यूयॉर्क – यूएस अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अमेरिकेची धावपट्टू अॅलिसिया मोन्टानो हिने प्रसुतीच्या काळात सहभाग नोंदवून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. अॅलिसिया मोन्टानो ही आठ महिन्यांची गरोदर असुन, तिची प्रसूत होण्याची तारीख अवघ्या चार आठवड्यांवर आली आहे. शर्यतील 2 मिनिट 32 सेकंदात 800 मीटर अंतर अॅलिसियाने कापले. पण तिला या शर्यतीत पराभवाचा सामना करावा लागला.
अडीच मिनिटांत पार केले गरोदर धावपट्टूने 800 मीटर अंतर
यूएस आउटडोर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपची मानकरी ठरलेली अॅलिसियाने गरोदर काळातही स्वत:ला फिट ठेवले आहे. तिला ही शर्यत कमी वेळात जिंकायची होती. मात्र, तिला विजयापर्यंत पोहोचता आले नाही. आपण पूर्ण प्रयत्न केल्याचे अॅलिसियाने सांगितले.
अॅलिसियाचा थोडक्यात परिचय – अमेरिकेची अॅलिसिया मोन्टानो ही कमी अंतराची धावपट्टू आहे. तिने पाचवेळा यूएस आउटडोर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचा खिताब आपल्या नावावर केला आहे. 2007 मध्ये तिने पहिल्यांदा चॅम्पियनशिप जिंकली होती. त्यानंतर 2010, 2011, 2012 आणि 2013 मध्ये मोन्टानो हिच विजेता ठरली.
अमेरिकन संघाकडून अॅलिसियाने 2012 मध्ये लंडन ओलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता. मोन्टानोचे वैशिष्ट्य सांगायचे तर ती केसांमध्ये फूल माळून शर्यतीत धावते. लंडन ओलिम्पिकमध्ये 800 मीटरच्या शर्यतीत ती पाचव्या स्थानावर राहिली होती.
अॅलिसियाने 2010 मध्ये दोहामध्ये झालेल्या वर्ल्ड इंडोर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 800 मीटरच्या शर्यतीत कांस्य पदक पटकावले आहे.
