सुआरेझवर चार महिने आणि नऊ सामन्यांची बंदी

suarej
रिओ दी जानिरो – इटलीच्या जिऑर्जिओ केलिनीच्या खांद्याला चावल्याप्रकरणी उरुग्वेचा ‘स्ट्रायकर’ लुइस सुआरेझवर चार महिने आणि नऊ सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे.

मंगळवारी झालेल्या वर्ल्डकप सामन्यादरम्यान इटली वि. उरुग्वे लढतीनंतर केलिनीने सुआरेझ सामन्यादरम्यान आपल्या खांद्याला चावल्याची तक्रार केली होती. खेळ संपायला एक मिनिट शिल्लक असताना चेंडूवर ताबा मिळवण्याच्या नादात सुआरेझ खांद्याला चावल्याचे केलिनीने म्हटले होते.

त्यानंतर लगेचच केलिनीच्या फिर्यादीची गंभीर दखल घेत ‘फिफा’ने बुधवारी सुआरेझच्या चौकशीचे आदेश दिले होते. तसेच या लढतीचे ‘फुटेज’ तसेच व्हिडिओ रेकॉर्डिग ‘फिफा’ने मागवले होते.

Leave a Comment