धनगर -लिंगायत समाज संतप्त ;आता आघाडी सरकारला धडा

vidhan-bhavan
सांगली – आघाडी सरकारने मराठा-मुस्लिम समाजाला आरक्षण देताना धनगर व लिंगायत समाजासाठी आरक्षण जाहीर केले नाही. त्यामुळे जुलैअखेर आरक्षणाचा निर्णय न झाल्यास विधानसभा निवडणुकीत आघाडी सरकारला धडा शिकवला जाईल, असा इशारा धनगर समाज महासंघाचे नेते अण्णा डांगे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

डांगे म्हणाले, धनगर व लिंगायत समाज आरक्षणाबाबत आश्‍वासन देऊनही मुख्यमंत्र्यांनी शेवटी फसवणूक केली. त्यामुळे समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.आरक्षणासाठी गांधीवादी मार्गाने आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे. संताप विध्वंसक मार्गाने न करता सनदशीर लोकशाही मार्गाने केला जाईल. समाजातील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी पुणे येथे बोलवली आहे. त्यामध्ये आंदोलनाची दिशा ठरवली जाईल.असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठा, मुस्लिम, धनगर आणि लिंगायत या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या समाजाच्या आरक्षणाबाबत एकत्रित निर्णय होईल अशी अपेक्षा होती. 16 व 17 जूनला झालेल्या बैठकीत धनगर समाजाचा प्रश्‍न मार्गी लावू, असे आश्‍वासन दिले गेले. मात्र प्रत्यक्षात काल मराठा, मुस्लिम समाजाचे आरक्षण जाहीर केले.त्यामुळे आघाडी सरकारने आमचा विचार न केल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत धडा शिकवला जाईल असा गर्भित इशारा त्यांनी दिला.

Leave a Comment