… आणि बोहल्यावर चढला शोएब अख्तर

shoaib
कराची – जगात ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’या नावाने प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानचा तेज गोलंदाज शोएब अख्तर अखेर विवाहबंधनात अडकला आहे. शोएबने पख्तूनखवा प्रांतातील हरिपूर भागात राहणा-या २० वर्षीय तरूणीशी लग्न केले आहे. एका टीव्ही चॅनलच्या रिपोर्टनुसार, बुधवारी शोएब व रुबाब या दोघांचाही निकाह पार पडला. संबंधित टीव्ही चॅनलच्या वृत्तानुसार, लग्नात हक मेहरची पाच लाख रुपये रक्कमही दिली गेली. या लग्नासाठी शोएबचे आई-वडिलही उपस्थित होते.

Leave a Comment