कार खरेदीसाठी खाजगी बँक देणार १०० टक्के कर्ज

car
मुंबई – कारविक्रीमध्ये मे महिन्यात झालेल्या वृद्धीमुळे काही खाजगी बँकानी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी १०० टक्के कर्ज देण्याची योजना अमलात आणली आहे. कॉपोरेट्‌सकडून वाहन कर्जाची मागणी घसरल्याने काही खाजगी बँक कार खरेदीसाठी १०० टक्के कर्जाची सोय उपलब्ध करून देणार आहे. मात्र या योजनेनुसार बँकेला बुडित कर्जाचे प्रमाण वाढण्याची भीती निर्माण होते आहे.

कार खरेदी करिता १०० टक्के कर्ज देणार्‍या बँकेमध्ये ऍक्सिस बँक आणि एचडीएफसी या बँकेचा समावेश आहे तर कोटक महिंद्र बँकेने ९५ टक्के कर्ज देण्याची तयारी दाखविली आहे. या व्यतिरिक्त काही बँकानी इन्शुरन्ससाठीही कर्ज देणार असल्याचे सांगितले आहे. मात्र अशा योजना फक्त कार खरेदी करणारे आणि कार कंपनी यांना उपयुक्त असल्या तरी कर्ज देणार्‍या बँकाना परवडणार नसल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे.

एखाद्या वस्तूसाठी देण्यात येणारे कर्ज त्या वस्तूच्या किंमतीपेक्षा कमी असणे बँकासाठी गरजेचे आहे. असाच व्यवहार काही बँक गृहकर्जाच्या बाबतीतही करतात. अशाप्रकारच्या कर्जपद्धतीमुळे कर्जाच्या रूपात घेतलेल्या मालमत्तेचे भाव कमी झाल्यास बँकेसाठी घातक ठरू शकते.

Leave a Comment