एन.श्रीनिवासन आयसीसीचे नवे बॉस

srinivasn
नवी दिल्ली – क्रिकेट जगतातील सर्वोच्च संस्था असलेल्या आयसीसीच्या चेअरमनपदी एन. श्रीनिवासन यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते पुढच्या आठवडयात पदभार स्विकारणार आहेत.

आयसीसीमध्ये काही घटनात्मक फेरबदल करण्यात आले. त्यानंतर मेलबर्न येथे नुकत्याच झालेल्या आयसीसीच्या बैठकीत श्रीनिवासन यांची निवड जाहीर करण्यात आली. ‘आयपीएल फिक्सींग’ प्रकरणातील चौकशीमुळे सर्वोच्च न्यायालयाने श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून दुर राहण्यास सांगितले होते. आयसीसी चेअरमनपदाच्या शर्यतीत उतरतानाही श्रीनिवासन यांना अनेक वादांना तोंड द्यावे लागले. बिहार क्रिकेट असोशिएशनने तर त्यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी श्रीनिवासन यांच्या बाजूने निर्णय दिला होता. तसेच, आयसीसीच्या निवडणुकीत चेअरमनपदासाठी उभे राहण्यास काही हरकत नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर अखेर आयसीसीच्या चेअरमनपदी एन. श्रीनिवासन यांची नियुक्ती झाली. आयसीसीच्या नव्या घटनात्मक बदलानंतर चेअरमनपदाला जादा अधिकार देण्यात आले आहेत.

Leave a Comment