
बगदाद – इराकमध्ये मौलवी मुक्तदा अल सद्रच्या हजारो निष्ठावंत शिया तरूणांनी बगदादच्या रस्त्यांवर पथ संचलन करून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यामुळे मोठया प्रमाणात इराकमध्ये जातीय तणाव वाढला आहे.
शिया तरूणांचे बगदादच्या रस्त्यांवर पथ संचलन
लष्कर आणि सुन्नी कट्टरपंथीयांमध्ये इराकच्या अनेक भागांमध्ये धुमश्चक्री सुरूच आहे. बगदादसारखे पथ संचलन इराकच्या अन्य प्रमुख शहरांमध्येही करण्यात आले. तर दुसरीकडे सुन्नी कट्टरपंथीय दहशतवाद्यांनी इराकचा बराचसा भुप्रदेश आपल्या ताब्यात घेतला आहे. देशातील अनेक शिया नागरिकही दहशतवाद्यांचा प्रतिकार करण्यासाठी पुढे आले आहेत. या सर्व प्रकारातून केवळ जातीय तणावात वाढ होत आहे. याशिवाय भारतातील अनेक शियापंथीय तरूण इराकला जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
